Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापूर जिल्हा पुन्हा लॉकडाऊन, जाणून घ्या कसे असेल स्वरूप

0

सोलापूर : पुनःच हरिओमची प्रक्रिया सुरू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, लॉकडाऊन करण्यासंबंधीत निर्णय घेण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवले होते. जिल्ह्यातील वाढता संसर्ग पाहता, जिल्हाधिकारी लॉकडाऊन संबंधी निर्णय घेऊ शकतात.

त्यानुसार सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण, या ठीकाणी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. १६ जुलै ते २६ जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत संचारबंदी तथा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी या सर्व ठिकाणी लॉकडाऊन असणार आहे.

काय सुरू राहणार काय बंद राहणार….

मागील दोन महिन्यात झालेल्या लॉकडाऊनमध्ये वेळ ठरवून किराणा दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती. मात्र यावेळी किराणा दुकाने उघडी ठेवण्यासाठीदेखील परवानगी नाही. उपहारगृह, लॉज हॉटेल, मंगलकार्यालये, बार, मोकळ्या जागा, क्रीडांगणे, मॉर्निंग वॉक, पूर्णपणे बंद राहणार आहे. उपहारगृहातून होम डिलिव्हरी ची सुविधा मात्र सुरू राहणार आहे. सर्व राष्तीयकृत बँकांचे अंतर्गत व्यवहार सुरू राहतील. परंतू नागरिकांसाठी बँकेचे व्यवहार बंद राहतील. एटीएम व एटीएमशी निगडीत सुविधा सुरू राहतील.

काय बंद असेल

कोव्हिड १९ महामारीशी निगडित सेवा देणारे दवाखाने, कॉरंटाईन सेंटर्स, पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. तसेच या संदर्भात काम करणारे नर्सेस, डॉक्टर्स, कामगार यांचे देखील काम सुरू राहतील. खाजगी दवाखाने सुरू राहतील. किंबहुना लॉकडाऊनचे कारण देऊन कोणते खाजगी दवाखाने उपचार नाकारत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे देखील नमूद करण्यात आलेले आहे. वैद्यकीय सेवेशी निगडित सर्व सेवा, मेडिकल्स सुरू राहतील. राज्यशासनाशी संबंधित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थाची कार्यालये, उपक्रम, (कोव्हिडशी निगडित वगळता) सर्व बंद राहील. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही बाहेर फिरता येणार नाही.

अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी, मीडियामध्ये काम करणारे कर्मचारी यांना बाहेर पडण्याची मुभा आहे परंतु ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील. खरीपाचा हंगाम लक्षात घेता शेतीशी निगडीत दुकाने, खतांची आणि औषधांची दुकाने सुरू राहतील. सर्व बांधकामांची कामे बंद राहणार असली तरी ज्या बांधकामांच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय आहे त्यांना काम सुरू ठेवता येईल. तसेच परिसरातील कारखाने व उद्योगधंदे सुरू राहतील, परंतु कामगारांची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी लागेल.

काय सुरू राहणार

Leave A Reply

Your email address will not be published.