Latest Marathi News

BREAKING NEWS

सिंधुदुर्गात धुव्वाधार, नद्या,नाल्याना आला पूर; राज्य मार्गासह ग्रामीण रस्ते पाण्याखाली;जनजीवन विस्कळीत

0

सिंधुदुर्ग : पावसाळा आला म्हणजे कोकणात मोठया प्रमाणात पावसाची बरसात होतेच…! जुलै महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.गेले दोन दिवस सिंधुदुर्गात कोसळधार सुरु असल्याने नद्या,नाल्याना पूरस्थिती आहे.त्यामुळे राज्य मार्गासह ग्रामीण भागातील डांबरी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे सिंधूदुर्गातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कोरोनसोबत आता पुराचे संकट

सिंधुदुर्गात २ जुलै पासून लॉकडाऊन ८ जुलै पर्यंत असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत.त्यातच गेल्या चार दिवसांपासून पावसाने हाहाःकार माजवला आहे.अनेक ठिकाणी पूर आल्याने शेतीला फटका बसत आहे.काही ठिकाणी भात शेती पाण्याखाली गेली आहे.सिंधुदुर्गातील सखल भागामध्ये पाणी साचले आहे.सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे.

शेतीची कामे अंतिम टप्प्यात

कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेती लागवट केली जाते.लॉकडाऊनमुळे प्रत्येक गावामध्ये चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यामुळे भातशेती लागवट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या भात लावणीची कामे केली जात आहे.जोरदार पाऊस होत असल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना अडथळा होत आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

महामार्ग बनला धोकादायक

सिंधुदुर्गात मुसळधार होत असल्याने मुबंई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर दिसत आहे.खचलेल्या भागामध्ये पाणी साचत आहे.तसेच अपूर्ण काम काही ठिकाणी रस्त्याचे असल्याने त्याचा फ़टका नागरिकांना बसत आहे.छोट्या मोरी,नाल्याची कामे अर्धवट राहिल्याने अनेक ठिकाणी शेतीत माती वाहून शेतकऱ्यांचे वागदे,ओसरगाव,कुडाळ बाबर्डे व अन्य गावामध्ये मोठे नुकसान झाले आहे.सध्या महामार्गावर दुतर्फा पाणी साचत असल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

कणकवलीत सर्वाधिक पाऊस

गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक १३३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात सरासरी ९४.०७५ मि.मी पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण १६९४.९०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – ९५ (१६०१), सावंतवाडी – ८७ (१७८२), वेंगुर्ला – ६९.६० (१७४२.२०), कुडाळ – १२० (१५७३), मालवण – १०४ (२१७८), कणकवली – १३३ (१६१५), देवगड – ८५ (१५२१), वैभववाडी – ५९ (१५४७) असा पाऊस झाला आहे.

भगवान लोके

Leave A Reply

Your email address will not be published.