Latest Marathi News

BREAKING NEWS

सिद्धिविनायक मंदिर आजपासून पाच दिवस बंद; ‘या’ कारणामुळे घेईनात आला हा निर्णय

0

मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेलं सिद्धिविनायक गणपती मंदिर आजपासून पुढील पाच दिवस बंद असणार आहे. या काळात भक्तांना गाभाऱ्यात जाऊन गणपतीचं दर्शन घेता येणार नाही. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार आहे. यासाठी पुढील पाच दिवस सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे असंही माहिती सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे

आजपासून 18 डिसेंबरपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. त्यानंतर 19 तारखेला गणेशमूर्तीची पूजा आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजेपासून भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. श्रींच्या प्रतिमेचं दर्शन घेता येणार सिद्धिविनायक गणपती मंदिर आजपासून पुढील पाच दिवस बंद असणार आहे. या काळात भक्तांना गाभाऱ्यात जाऊन गणपतीचं दर्शन घेता येणार नाही.

सिद्धिविनायकाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार आहे. यासाठी पुढील पाच दिवस सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र या काळात भाविकांना श्रींच्या प्रतिमेचं दर्शन घेता येणार आहे. सिद्धिविनायक मंदिर आजपासून 18 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असून, 19 तारखेला गणेशमूर्तीची पूजा आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजेपासून भाविकांना गाभाऱ्यात जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.