Latest Marathi News

BREAKING NEWS

शुद्धीकरणाच्या नावाखाली पतीसमोर महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल

0

मुंबई | महाराष्ट्र हा शाहू-फुले-आंबेडकरांचा असा मानला जात असला तरी आजही आपल्या राज्यात अंधश्रेद्धेला खतपाणी घालण्याचे काम काही शिक्षित मंडळी करताना दिसून येत आहेत अशातच मोठे गुन्हे घडताना दिसून येत आहे त्यातच आताअशीच एक घटना मुंबईतून समोर येत आहे. बोरिवलीत शुद्धीकरणाच्या नावाखाली पतीसमोरच एका बुवाने बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता मासिक पाळीतील रक्ताचा वापर जादूटोण्यासाठी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी मांत्रिकासह पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

व्यवसायाने वकील असलेली ४५ वर्षीय तक्रारदार पालघर परिसरात राहण्यास आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २००१ ते मे २०२२ दरम्यान त्यांच्या ५१ वर्षीय पतीने वेळोवेळी मारहाण केली. तसेच २१ वर्षीय मुलीचे भूत मागे लागल्याचे सांगत शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली तांत्रिक बाबा संदीप जोशीकडे नेले. त्याने त्याच्या बोरिवलीतील भूषण प्लाझामधील फ्लॅटमध्ये नेले. तेथे सुरुवातीला बाबाने जातिवाचक अपमानास्पद वक्तव्य केले.

तसेच प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून पतीसमोर बलात्कार केला. तसेच बाबाच्या सांगण्यावरून चांदीच्या वाटीत मासिक पाळीचे रक्त तांत्रिक पूजेसाठी वापरल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पुढे त्रासातून कायमची सुटका करण्यासाठी ४९ हजार रुपयांची मागणी केली. पैसे नाही दिले तर मृत्यू होईल, अशी भीती घालून ४९ हजार रुपये उकळल्याचा आरोप महिलेने केला. या तक्रारीविरोधात विविध कलमा अंतर्गद गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.