Latest Marathi News

BREAKING NEWS

शोभाताई सोपल स्कूलची बाल वारकरी दिंडी

0

शोभाताई सोपल स्कूलची बाल वारकरी दिंडी

बार्शी |

स्व शोभाताई सोपल स्कूल, पांगरी येथे आषाढी एकादशी निमित्त मोठ्या भक्ती-भावाने व उत्साहाने दिंडीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील सर्व वारकरी चिमुकल्यांनी सहभाग घेऊन अगदी साक्षात पंढरपूर वारीचे दर्शन पांगरी पंचक्रोशीतील गावकऱ्यांना घडविले.

या दिंडीमध्ये कोणी विठ्ठल-रुक्मिणी, जनाबाई, ज्ञानेश्वर, तुकाराम तर काहींनी वारकरी पोशाख परिधान करून आले होते, तसेच या दिंडीमध्ये या बाल वारकऱ्यांच्या टाळ, पकवाद, विठ्ठल नाम तसेच अभंगाच्या निनादाने सर्व वातावरण अगदी आनंदी व भक्तिमय झालेले दिसत होते.
या दिंडीची सुरुवात सकाळी ८:५० वा. बाजार पेठेतील हनुमान मंदिरापासून करण्यात आली व सांगता श्रीराम पेठेतील श्रीराम मंदिररात विठ्ठल नामाच्या गजरात झाली. दिंडी दरम्यान काही उत्स्फूर्त गावकऱ्यांनी दिंडीतील पालखीचे पूजा करून स्वागत केले तर गोडसे गल्लीतील तरुण मंडळ यांनी वारकऱ्यांना खाऊ वाटप केला तर दिंडीच्या शेवटी प्रशालेतर्फे सर्व वारकऱ्यांना नाष्ट्याची सोय करण्यात आली.

याप्रसंगी प्रशालेतील शिक्षिका तसेच शिक्षक स्टापनी देखील आपल्या भक्ती भावाचे प्रदर्शन केले, कोणी अभंग तर कोणी फुगड्या खेळून आपला आनंद व्यक्त केला.
बाल वारकरी दिंडीचे परिश्रम शाळेतील सर्व शिक्षकवृंद व इतर कर्मचारी यांनी घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.