Latest Marathi News

BREAKING NEWS

शिल्लक सेना ही इमानदार मावळ्यांची, सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला

0

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी खोके घेणारे बेइमानी निघून गेलेत. आता शिल्लक राहिलेली शिवसेना इमानदार मावळ्यांची आहे, त्यामुळे आम्हाला शिल्लक सेना म्हटले तरी काही वाईट वाटणार नाही, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला.

महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या अंधारे यांनी काल, मंगळवारी (दि. १५) सायंकाळी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेला राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी नेतृत्वामुळे शिवसेनेशी विविध घटकांमधील लोक जोडले जात असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. महाप्रबोधन यात्रेमध्ये आज बुधवारी दुपारी १२ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात अंधारे यांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा होत आहे. सायंकाळी ६ वाजता गारगोटीमध्ये जाहीर सभा होणार आहे.

काल, मंगळवारी कुरुंदवाड येथे झालेल्या जाहीर सभेत खासदार धैर्यशील माने यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. माने यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे शिवसैनिक त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी त्यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचाही चांगलाच समाचार घेतला. या गद्दारांना खाली खेचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहनह त्यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.