Latest Marathi News

BREAKING NEWS

गुलाबराव पाटलांचा उल्लेख करत सुषमा अंधारेंची फडणवीसांवर सडकून टीका

0

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार चांगलाच निशाणा साधला आहे. अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून महिलांबाबत केलेल्या विधानांवर भाष्य केले आहे.यावेळी त्यांनी भाजपाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आदि नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्या कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या.

यावेळी सुषमा अंधारे यांनी, “सध्याच्या सरकारमध्ये महिलांचा कशा पद्धतीने अपमान केला जातो, ते अत्यंत वाईट आहे. सोलापूरचा भाजपच्या जिल्हाध्यक्षांसोबत एका महिलेने हॉटेलमधून व्हिडीओ जारी केला होता. त्या व्हिडीओमध्ये संबंधित महिला स्वत:चं नाव सांगतं होती, संबंधित जिल्हाध्यक्षांचं नाव सांगत होती. त्यांच्या दोघांत काय नातं आहे? त्याचा खुलासा करत होती, हा माणूस अत्यंत नीच आहे, असंही ती महिला म्हणत होती. पण भारतीय जनता पार्टीने त्याच्याविरोधात विनयभंगाचा किंवा बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही.”

तसेच “शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीही असाच प्रकार केला. एका महिलेनं राहुल शेवाळेंसोबतचा लिफ्ट, मॉल आणि हॉटेलमधील विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल केले. तसेच राहुल शेवाळेंपासून आपल्या जीवाला धोका आहे, असंही त्या म्हणाल्या. पण देवेंद्रभाऊंना त्याबद्दल काहीच वाटलं नाही. या लोकांची महिलांबद्दल काय मानसिकता आहे, हे यातून दिसतं” अशी टीका अंधारेंनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.