गोहाटी मध्ये तब्बल ४० हुन अधिक आमदार शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदें सोबत आहे, शिवसेनेचे दोन भाग झाल्याचे पाहायला मिळत असून शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आहे. असे स्पष्ट झाले. गोहाटी मध्ये तब्बल ४० हुन अधिक आमदार एकनाथ शिंदें सोबत आहे, शिवसेनेचे दोन भाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्या या घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे
शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आहे. असे स्पष्ट झाले. कॉग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता नको असे मत या गटाचे आहे. तसेच प्रहार पक्षाचे नेते बचू कडू यांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि ते देखील गोहाटीत असल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचे ५ आमदार देखील त्याच्या सोबत आहे. त्यात मंत्री अब्दुल सत्तर आणि मंत्री संदिमान भुमरे यांचा देखील समावेश आहे.
अशात शिवसेनेनं आमदारांना अल्टिमेटम दिले आहे, आज संध्याकाळी शिवसेनेने बैठक बोलवली आहे. यात हजार राहणे अनिवार्य असेल. बैठकीला गैरहजर असलेल्या आमदारांनावर पक्ष कडून कारवाई करण्यात येईल. आमदारांना व्हाट्सअप, ई-मेल द्वारे हे पात्र पाठवण्यात आले आहे. त्यात बैठकीला नसलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे, आता आमदार सभेला उपस्थित राहतील का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहे.