Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवसेनेच्या या प्रमुख नेत्याची गोळ्या झाडून हत्या..!!

0

मुंबई : मध्यप्रदेशातील शिवसेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश साहू यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. इतकेच नाही तर त्यांची पत्नी आणि मुलगी यांना देखील आरोपींनी जखमी केलेले आहे. गोळ्या झाडून आरोपी फरार झालेले आहेत. पोलीस आता आरोपींचा तपास करत आहेत.

इंदोर जवळील उमरी खेडा या ठिकाणी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. रमेश साहू उमरी खेडा इथे साईराम नावाचा ढाबा चालवत होते. तिथेच त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. तसेच वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नी आणि मुलीला देखील आरोपींनी त्रास दिला. या झटापटीत त्या दोघीही जखमी झाल्या आहेत.

घटनास्थळी कोणताही लुटमारीचा प्रकार घडला नाही. त्यामुळे आरोपी हत्येच्याच उद्देशाने आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पूर्ववैमनस्यामधून ही हत्या झाली असल्याचे पोलिसांकडून बोलले जात आहे. हत्येनंतर रमेश साहू यांचे शव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. घडला प्रकार डोळ्यांनी पहिल्याने त्यांची मुलगी आणि पत्नी यांना धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.