Latest Marathi News

BREAKING NEWS

 शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून मनसेच जोरदार टोला 

0

 

 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संभाजी ब्रिगेड सोबत युती केल्याचे जाहीर केले. दरम्यान मागच्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीमध्ये नव्या राजकीय मनोमिलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संभाजी ब्रिगेडच्या युतीचा शिवसेनेला फायदा होणार का? हे येणाऱ्या काळातील निवडणुकांमधून समजणार आहे. दरम्यान मनसेचे एकमेव आमदारांनी या युतीवरून शिवसेनेला डिवचले आहे.

 

पुढच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर झालेल्या या युतीचा सर्वच राजकीय पक्षांनी धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेवर भाजपकडून सडकून टीका होत असतानाच मनसेनेही या युतीवर जोरदार हल्ला करण्याची संधी साधली आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांच्यापाठोपाठ मनसे आमदार राजू पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.

 

मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटर आणि फेसबुक पोस्ट करत माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्याशी हात मिळवणी करत राज्यात नव्या राजकीय समीकरणांना खत पाणी घातले आहे. आता मनसेच्या या टीकेला शिवसेनाकाय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.