Latest Marathi News

BREAKING NEWS

‘नाटकाच्या कामातून खासदारांना वेळ मिळेना’; अजित पवारांचा अमोल कोल्हेंना टोला

0

पुणे | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाळकी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार, विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले की, खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेल्या डॉ. अमोल कोल्हेंना मीच थांबविले आणि पाच वर्षे काम करा म्हटले. आणि आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय. याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना आणि आता नुसते डॉयलॉग बोलत शिरूरच्या मतदारांना भुलवतोय.

ही देशाची निवडणूक आहे. त्यामुळे कुणीही भावनिक होऊ नका. तुम्हाला विकास हवा असेल तर सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून द्यायला हवा. असं म्हणत शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, परंतु मी त्यांचा मुलगा नाही. अशी खंत देखील अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली. तर शिरूरच्या खासदाराने कोणत्याही गावाचा विकास केला नाही. ते निवडून गेल्यानंतर कुठेच फिरकले नाहीत, अशी टीका देखील अजित पवारांनी कोल्हेंवर केली.

Leave A Reply

Your email address will not be published.