बार्शी : भाग्यकांता संचालित शब्दरंग तर्फे या वर्षी बार्शी मध्ये प्रथमच सर्व वयोगटाच्या व्यक्तींसाठी अत्यंत प्रोफेशनल पातळीचे नाट्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या शिबीरात अभिनय,नेपथ्य,प्रकाश योजना,ध्वनी संयोजन, रंगभूषा,वेशभूषा,संवाद कौशल्य या सर्व बाबींचे प्रशिक्षण देण्यात येईल. शिबीराच्या शेवटी शिबीरार्थीकडून एक एकांकिका देखील सादर करून घेतली जाईल. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि ८ वर्षापुढील लहान मुले असे सर्व जण या मध्ये सहभागी होऊ शकतात.
या शिबिरामध्ये डॉ.श्री.किरण लद्दे,यांचे मार्गदर्शन शिबीरार्थीना लाभणार आहे. डॉ.किरण लद्दे यांना doctorate of philoplsophy in dramatics मिळालेली असून ते master of performing art specialization production and direction ही पदवी प्राप्त केलेले अत्यंत तरुण दिग्दर्शक आहेत. महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद तसेच अनेक बालनाट्य, महिला नाट्य स्पर्धामध्ये त्यांनी दिग्दर्शना साठी असंख्य वेळा प्रथम पारितोषिके जिंकली आहेत. त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे तर्फे श्री बापू पेंढारकर स्मृती पुरस्कार यासोबत अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच या शिबिरासाठी उपलब्ध असणारे दुसरे मार्गदर्शक म्हणजे डॉ. मयूर तिरमाखे हे कोपरगाव येथे सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ् म्हणून काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धे मध्ये सहभागी होऊन अनेक पारितोषिके त्यांनी मिळवली आहेत. नुकताच त्यांनी स्वतः दिग्दर्शीत केलेला, सिद्धार्थ जाधव अभिनीत पहिला मराठी चित्रपट लग्न कल्लोळ बॉक्स ऑफिस वरती यशस्वी ठरला आहे.
यासोबतच या शिबीरामध्ये मार्गदर्शन करणारे तिसरे प्रशिक्षक हे आपल्या बार्शी मधील सुप्रसिद्ध अभिनेते अभय चव्हाण हे आहेत. अभय चव्हाण यांनी आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या असून अनेक documentry आणि music अल्बम मध्ये देखील काम करून या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.
हे शिबीर दिनांक ११ मे ते १८ मे पर्यंत घेण्यात येणार असून त्याची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. शिबीर सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे घेण्यात येणार आहे.यासाठी चे शुल्क केवळ १५०० रुपये आकारण्यात आले आहे.
तरी इच्छुक व्यक्तींनी अधिक माहिती
साठी डॉ.कैवल्य गायकवाड आणि डॉ.तनुजा चिकणे यांच्याशी संपर्क साधावा.
Ph: 9423560600.