मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जनतेचा विश्वासघात करून सत्ता स्थापन केली. हे सरकार घटनाबाह्य, नियमबाह्य असून लवकरच कोसळणार, असे म्हणत युवा सेनेचे प्रमुख व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरात आयोजित सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.
राज्यातील सुशिक्षित तरुणांना बेरोजगार करण्याचे काम शिंदे सरकारने केले असून चार मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जातात कसे, याचा विचार जनतेने केला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जनतेचा विश्वासघात करून सत्ता स्थापन केली. हे सरकार घटनाबाह्य, नियमबाह्य असून लवकरच कोसळणार असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
पन्नास खोके घेणाऱ्या 40 आमदारांना राज्यात तोंड दाखवने मुश्किल झाले आहे. लग्नात गेल्यावर नातेवाईक व नागरिक विचारणा करीत असल्याने गद्दारांची मोठी अडचण झाली आहे. अतिवृष्टि झाल्यावरही शेतकरी बांधवांना आर्थिक मदत नाही. जनतेला राज्याचे कृषीमंत्री कोण, हे माहीत नाही. कृषीमंत्री राज्यात फिरकलेच नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावेळी ‘ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा खुर्च्या खाली करा’ अशा घोषणाही देण्यात आल्या.