पुणे |
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या कोथरूड मतदारसंघात कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिरात आयोजित काकड आरतीस चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित राहून विठू माउलीची मनोभावे पूजा केली. यावेळी विठ्ठलाचे नामस्मरण करुन, हरीभक्तीत तल्लीन झाले. यावेळी भक्तगणही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विठू माऊली कडे तसेच सर्वांना उत्तम आरोग्यासाठी विठूरायाच्या चरणी प्रार्थना केली.