Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे गटाच्या मंत्र्याचे ऑपरेशन सुरु असताना अचानक लाईट गेली आणि मग.

0

औरंगाबादमध्ये शिंदे गटाचे मंत्री आणि रोजगार हमी योजनेचे मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचं ऑपरेशन झाले. मात्र, ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेली. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पीटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करत आपला संताप व्यक्त केला.

मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. पाहणी करत-करत भुमरे सरकारी दवाखान्याच्या दंत चिकित्सा विभागात पोहोचले. भुमरेंनी व्यवस्थेची विचारपूस केली. आणि त्यानंतर त्यांच्या दातांची तक्रार डॉक्टरांना सांगितली. तपासणीनंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला.. मग भुमरेंनी आधी रुट कॅनल केलं आणि त्यानंतर शस्रक्रियेसाठी दवाखान्यात पोहोचले. मात्र, ऐनवेळी लाईट गेली आणि सारा गोंधळ झाला.

पण, ऑपरेशन थिएटरमध्ये अनेक डॉक्टर उपस्थित असल्यामुळे सर्वांनी एकाचवेळी मोबाईल टॉर्च वापरुन ऑपरेशन पार पाडलं. ऑपरेशननंतर रुग्णालयात जनरेटर कसा नाही म्हणून भुमरेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितलं की जनरेटरची मागणी मागच्या पाच वर्षांपासून केली आहे. मात्र, त्यावर आजतागायत निर्णय झालेला नाही. आता जनरेटर नसताना अचानक लाईट गेल्यावर काय होतं, याचा अनुभव खुद्द मंत्री संदीपान भुमरेंनाच आला होता. त्यामुळे भुमरेंनी रुग्णालयातूनच जनरेटरचा प्रस्ताव तातीडनं मंजुरीचे निर्देश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.