Latest Marathi News

BREAKING NEWS

शेंबड्या पोरानं मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं – प्रवीण दरेकर

0

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यावरून वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच मुंबई मनपाच्या भ्रष्ट कारभारावरून शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत अशातच आमदार आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपाच्या कथित घोटाळ्यावरून थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. यावरून आता भाजपा नेते आणि विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरेंना खडेबोल सुनावले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाज आदित्य ठाकरे काढतो, त्याचा जीव केवढा त्याचं वय काय?. खरंतर शेंबड्या पोराने मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं अशी टीका विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरेंवर केली. दरेकर हे साता-यात आले हाेते. त्यावेळी दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाज आदित्य ठाकरे काढतो त्याचा जीव केवढा त्याचं वय काय? शेंबड्या पोराने मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं. सत्ता आणि पक्ष गेल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेत. यामुळे अशी वक्तव्य हे लोक करत आहेत असेही प्रवीण दरेकर यांनी नमूद केले.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, हा प्रग्लब विचारांचा महाराष्ट्र आहे असे किती येतात आणि किती जातात. या मातीत अनेकांनी पाय रोवण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पक्ष देखील धडपड करत आहे. इतर कोणीही येऊ अगदी बीआरएस आले तरी काही फरक पडणार नाही असे दरेकर यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.