Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवार यांच्या पॅनलला हरवलं, गुणरत्न सदावर्ते यांची निवडणुकीत जोरदार बाजी

0

मुंबई |

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी आंदोलनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांवर सदावर्तेंची जादू कायम असल्याचं दिसतंय.

शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलचा सदावर्ते यांच्या पॅनलने दारुण पराभव केलाय. ते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चर्चेत राहिले ते आपल्या विधानांमुळे, कधी मराठा आंदोलनावर भाष्य तर कधी नथुराम गोडसे यांचे समर्थन करताना ते बघायला मिळाले. जवळपास १५ वर्षांपासून कामगार संघटनेचं स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप बँकेवर वर्चस्व होतं. मात्र, एसटी आंदोलनानंतर या बँक निवडणुकीला एक वेगळी दिशा मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.