Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवार यांचा नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काढला चिमटा

0

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदींनी केलेल्या एका वक्तव्याचा आधार घेत संसदेत जायला का घाबरतो? याचं कारण सांगितलं आहे. नुकतंच पार पडलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यांच्याबरोबर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, आता मी सुशीलकुमार शिंदे यांचा उल्लेख आवर्जून करु इच्छितो, कारण ते म्हणाले मी शरद पवारांच्या तालमीत तयार झालो. हल्ली मला असं कोणी म्हटलं की भीती वाटते. त्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी कोणीतरी म्हटलं की शरद पवारांचे बोट धरुन राजकारणात आलो. तेव्हापासून तर मी दिल्लीच्या संसदेत जायलाही घाबरतो, असं म्हणत त्यांनी नाव न घेता मोदींना टोला लगावला आहे.

सुशीलकुमार शिंदे यांनी भाषणात त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील शरद पवारांचं योगदान असल्याचं सांगितलं. मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झालो, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. त्यानंतर काही वेळात शरद पवार भाषणासाठी स्टेजवर गेले आणि त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या भाषणाचा आशय घेत मोदींना नाव न घेता टोला लगावला. त्यावेळी सगळ्या सभागृहात हशा पिकला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.