Latest Marathi News

BREAKING NEWS

‘राष्ट्रवादीला धक्का खडसेंसोबत राष्ट्र्वादीत गेलेल्या पाच नेत्यांची पुन्हा भाजपात घरवापसी’

0

एकनाथ खडसे यांनी काही महिन्यापूर्वी भाजपाला सोडचिट्टी देत राष्ट्वादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत जळगावातील असंख्य भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्र्वादीत प्रवेश केला होता. मात्र आता राष्ट्रवादीत प्रवेश गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.

भुसावळमध्ये राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये या नेत्यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. हा खडसे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपच्या ९ नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसध्ये प्रवेश केला होता. मात्र आता यातील पाच जणांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपात दोन लोकसभा आणि दहा विधानसभेच्या जागेची आठवले गटाची मागणी

सर्वांनी गणेशोत्सव काळात अधिक सतर्क रहावे, अतिशय शांततेत गणेशोत्सव सोहळा संपन्न करावा – चंद्रकांत पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.