Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवार गटातील आणखी आमदार अजित पवारांसोबत जाणार

0

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्र्वादीत फूट पडल्यांनंतर आता अजित पवार गटाकडून शरद पवारांचा समर्थक अमर फोडण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने सुरू केल्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र प्रसिद्ध माध्यमांनी हे वृत्त दिल्यानंतर आम्ही सगळे साहेबांसोबतच (शरद पवार) असे ट्विट जयंत पाटील यांनी केले.

शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत पण त्यांना बडव्यांनी घेरले आहे असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. हे बडवे नेमके कोण याची चर्चाही त्यावेळी रंगली होती आणि त्यानिमित्ताने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड अशी नावे समोर आली होती. मात्र आता जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या इराद्याने अजित पवार गट कामाला लागला आहे.

तसेच यासंदर्भात प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे समजते. पाटील यांनी या हालचालींना अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. शरद पवार यांच्यासोबतच राहण्याची भूमिका ते घेत आहेत तरीही त्यांचे मन वळविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. पवार यांच्या बंडानंतर त्यांच्यावर टीका करत शरद पवार गटाचा किल्ला जयंत पाटील यांनीच लढवला होता.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या वेगवेगळ्या बैठकी झाल्या होत्या.त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत असलेले बरेच आमदार गेल्या आठ दिवसांत अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यात राजेंद्र शिंगणे, मकरंद पाटील, किरण लहामटे यांचा समावेश आहे. आशुतोष काळे परदेशात होते. परतल्यानंतर ते थेट अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. अद्याप शरद पवार यांच्यासोबत असलेल्यांपैकी काही आमदार नक्कीच आमच्यासोबत येतील असा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.