Latest Marathi News

BREAKING NEWS

शाईफेक घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांचे शरद पवारांना चॅलेंज

0

भारतीय जन पक्षाचे नेते आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पुण्यामध्ये (Pune) शाईफेक झाली आणि राज्यातले वातावरण चांगलेच तापले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.विरोध म्हणून काही तरुणांनी त्यांच्यावर शाईफेक केली. आता या घटनेमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पाटील म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस मला नेहमी टार्गेट करते. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे, म्हणून हे त्यांच्या डोळ्यात खुपत असावे. त्यांना महाराष्ट्रामध्ये घराणेशाही आणायची आहे. मी कुणालाही घाबरणार नाही, मी चळवळीतून आलेलो आहे. मी शरद पवारांना डायरेक्ट चॅलेंज करतो की, तुमची सगळी प्रकरणे मी बाहेर काढणार.” असा इशारा त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीला दिला आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश पिंपरी न्यायालयाने दिले. तसेच, याप्रकरणी ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबनदेखील करण्यात आले आहे. यामध्ये ८ पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांची कडेकोट सुरक्षा भेदून झालेल्या या हल्ल्यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्यात पोलिसांचा कोणताही दोष नसल्याचे सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.