Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवरायांविषयीच्या ‘त्या’ वक्तव्यावर राज्यपालांचं लांबलचक पत्र

0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्युना काळातील आदर्श असा उल्लेख केल्याने राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलं आहे. राज्यपालांना परत पाठवा अशी मागणी सातत्याने राज्यभरातून केली जातेय. तसेच राज्यपालांविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील करण्यात आली आहेत.

भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. त्यानंतर आता राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीत आपल्या विधानाचा खुलासा केला आहे. महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

राज्यपालांनी पत्रात काय म्हटलंय?

“माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले. मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेत. पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात.

याचाच अर्थ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो. आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदरथी विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो, याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही. येथे कुठेही तुलना करणे हा विषयच असू शकत नाही,” असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.