मुंबई | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं. यानंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. बंडखोरी करणाऱ्या अनेकांवर शिवसेनेनं कारवाईही केली. आता शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाऐवजी केली होती ‘ही’ मागणी, या नेत्याचे सुचवले होते नाव, संजय राऊतांचा दावा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे शिवाजी आढळराव पाटलांना मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांनी त्यावर गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं कॅप्शन लिहिलं होतं. यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकलेला नव्हता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.