Latest Marathi News

BREAKING NEWS

सावधान! पुढील चार दिवस पावसाचे, ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धुवाधार पाऊस

0

 

राज्यात सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. राजधानी मुंबईसह ठाणे परिसरात परतीचा पाऊस चांगलाच बरसत आहे. सकाळी देखील राजधानी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. कोल्हापूर मध्ये देखील परतीच्या पावसाचा कहर बघायला मिळाला असून कोल्हापूर मध्ये वादळी वाऱ्याचा देखील प्रकोप पाहायला मिळाला. यामुळे कोल्हापूर शहरात वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांसाठी पावसाचा येलो ॲलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाचे मते पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. मित्रांनो राज्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे.

शिवाय आता परतीचा पाऊस देखील राज्यात चांगला होत असल्याने रब्बी हंगामात पावसाची कमतरता जाणवणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. परतीच्या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी फायदा होणार असल्याचे कृषी तज्ञ नमूद करत आहे. मित्रांनो आज कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने या तीन जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.