तेलुगू इंडस्ट्रीतील अभिनेती सुधीर वर्माने काल आत्महत्या केली. यामुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. सध्या इंडस्ट्रीत नैराश्येतून आत्महत्येच्या घटना सतत समोर येत आहेत. वैयक्तिक कारणामुळे तणावातून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या वृत्तामुळे साऊथ फ्लीम इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
१० जानेवारी रोजी सुधीरने विषारी पदार्थाचे सेवन करत आत्महत्या केली. रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबियांना सुपुर्द करण्यात आले.सुधीर वर्माचा जवळचा मित्र सुधाकर कोमाकूलने ट्वीटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली. त्याने लिहिले, ‘सुधीर खूप मनमिळाऊ आणि चांगला व्यक्ती होता. त्यांच्यासोबत काम करताना मजा आली होती. तुझ्या जाण्याने हृदय तुटले आहे. तू एक चांगला कलाकार आणि खूप चांगला मित्र होतास. तुझा आठवण कायम येत राहिल.’
सुधीरच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी सुरु झाली आहे. तेलुगू फिल्म इंडस्ट्री शोकाकूल झाली आहे. कोणालाच विश्वास बसत नाहीए. सुधीरने ‘कुंडनापु बोम्मा’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. याशिवाय ‘शूट आऊट इन अलैर’ या वेब सिरीजतूनही त्याला प्रसिद्धी मिळाली. मागच्याच महिन्यात हिंदी टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने मालिकेच्या सेटवरच आत्महत्या केली. यामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली. आता आणखी एका तरुण अभिनेत्याने आत्महत्या केल्याने मनोरंजन विश्व हळहळले आहे.