बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनामध्ये त्यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हजेरी लावली. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात भाषणात फटकारे लावले. बाळासाहेबांच्या नावाच्या आधी हिंदूहृदयसम्राट, असे लावण्यात आल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या गैरहजेरीबाबतही राज ठाकरे अप्रत्यक्षपणे बोलले. इकडे उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या सर्वांचे… असे म्हणत राज ठाकरेंनी शाब्दिक कोटी केली.
महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप सरकार स्थापन करताना येत असलेल्या अडचणींवेळचा बाळासाहेबांचा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला. ‘नारायण राणे मुख्यमंत्री असताना काही कारणास्तव मुख्यमंत्री पदावर युती अडकवली होती १५ दिवस तो खेळ सुरू होता. ऐकेदिवशी दुपारी जावडेकरांसह भाजप नेते मातोश्रीवर आले. त्यांना बाळासाहेबांची भेट घ्यायची होती.
आज सरकार आपले सरकार बसणार ते म्हणत होते. निरोप द्या म्हटले. ‘सुरेशदादा जैन हे युतीचे मुख्यमंत्री बनतील हे कानावर घाला असे ते म्हणाले. मग मी बाळासाहेबांना निरोप द्यायला गेलो. मी त्यांना निरोप दिला त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी बसेल दुसरा नाही मग पून्हा वळून झोपले. मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेलाही लाथ मारली,’ असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला. तसेच मी लहानपणापासून साहेबांसोबत असल्यानेच स्वत:चा एक पक्ष काढू शकलो नाही तर, मी पक्ष काढू शकलो नसतो, अशी कबुलीही राज ठाकरे यांनी दिली.