एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दगादेऊन भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून सरकार स्थापन केले मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते अशातच मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील अनेक आमदार मंत्री पद मिळण्याची अपेक्षा करत असताना अद्यापही दुसयांदा मंत्री मंडळाचा विस्तार न झाल्यामुळे अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात असून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात सामील होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. अशातच अशोक चव्हाण हे भाजपात जातील असे विधान आमदार संजय सिरसाठ यांनी केले होते त्यांच्या या विधानाची आता अशोक चव्हाण यांनी फिरकी घेतली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ हे काही भविष्यकार नाहीत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज मला वाटत नाही.दुसरा मुद्दा म्हणजे शिरसाठांना आता मंत्रिमंडळात घेणार नाहीत, हे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने त्यांना परत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याशिवाय पर्याय नाही, असे माझे भाकीत असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
शिरसाठ यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपत जातील, असे वक्तव्य केले होते. त्याचा चव्हाणांनी कठोर शब्दात समाचार घेतला. यावेळी महाविकास आघाडीच्या सभेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडल्याच्या विषयावर चव्हाणांनी टीका केली. राजकारणात खालच्या स्तरावर जाऊन जे सुरू आहे, ते अतिशय चुकीचे आहे. सभेचे ठिकाण हे सार्वजनिक आहे. कोणालाही तेथे सभा घेण्यापासून रोखले नाही. तुमच्या सभा झाल्या म्हणजे आम्हीही गोमूत्र शिंपडायचे का? तुम्हाला तुमची वैचारिक भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, जे कृत्य करत आहात ते लोकांना आवडत आहे, असे जर वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे.