ठाकरे गटाच्या पदाधिकारी रश्मी शिंदे यांना सोमवारी (3 एप्रिल) मारहाण झाली होती. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे यांना दुखापत झाली असून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी आता शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तसेच या घटनेवरून त्यांनी शिंदे गटावर सुद्धा जोरदार निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, अशा प्रकारे मारहाण करणं हे माणुसकीला न शोभणारं आहे. पक्षीय राजकारणातील गलिच्छ स्तर आता पाहायला मिळतोय. हे योग्य नाही. आपण किमान माणुसकी धर्मतरी पाळला पाहिजे. याआधी कुणावर टीका झाली नाही का? याआधीही टीका झाली पण तेव्हा एवढ्या खालच्या पातळीला कुणी जात नव्हतं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. त्या पुण्यात बोलत होत्या.
काल रात्री ठाण्यात रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली रोषही शिंदे घ्या सहा महिन्याचा गरोदर असल्याची माहिती समोर येत आहे तसेच त्यांना सध्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे अशातच आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज ठाण्याला जाणार असून रोषही शिंदे यांची भेट घेणार आहे.