Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊतांच्या चौकशीसाठी पोलीस पोहचले नाशिकच्या हॉटेलवर

0

आपल्याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठवलेल्या गुंडांपासून धोका आहे असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहून केला होता. त्यानंतर आता राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलीस नाशिकला पोहोचले आहे. तसंच राऊत यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

संजय राऊत हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केल्यानंतर आज ठाणे पोलिसांकडून संजय राऊत यांचा जबाब घेण्याचे काम सुरू आहे. ठाण्याचे एसीपी संजय राऊत यांचा भेटीला नाशिकमध्ये पोहोचले.

ठाणे पोलिसांच्या 6 जणांचे पथक नाशिकच्या एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये पोहोचले आहे. राऊतांच्या आरोपानंतर ठाणे पोलिसांकडून राऊत यांचा जवाब घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, राऊतांच्या पोलीस सुरक्षेत वाढ केली आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राऊतांची सुरक्षा वाढवली आहे. संजय राऊतांना नाशिक पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. मंगळवारपासून नाशिकमध्ये आलेले संजय राऊत आज सिन्नरकडे जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.