केंद्रीय निडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालय मिळण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रव्यवहार केला आहे तर दुसरीकडे मुBMC मधील कार्यालय सुद्धा ताब्यात घेण्याच्या हालचाली शिंदे गटाने सुरु केल्या आहेत अशातच आता थेट कसदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.
मिंधे गटाने शिवसेनेची कार्यालये ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या मुद्द्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटावर हल्लाबोल केला आहे. मंगळवारी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाचा निर्णय हा ‘मेरी मर्जी’ वाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला आहे.दडपशाही, दबाव, सत्ता आणि पैसा या माध्यमातून मिळवलेला हा निर्णय आहे. यासाठी दोन हजार कोटींचं पॅकेज वापरण्यात आलं आहे. तुम्ही या जोरावर शिवसेनेच्या सरकारी कार्यालयांचा ताबा घ्याल, परंतु लाखो जनता आज खवळून उठली आहे त्यांचा ताबा कसा घ्याल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवसेना हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. शिवसेना ही मराठी माणसाचा आवाज आहे. बाळासाहेबांनी 55 वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना ही महाराष्ट्र, मुंबई व मराठी माणसांसाठी केली. ही शिवसेना संपावी यासाठी दिल्लीश्वरांनी प्रयत्न सुरु केले. ते आम्ही हणून पाडले. आता ते करण्यात काहींना यश मिळाले मात्र आता महाराष्ट्रातली जनता आता पेटून उठली आहे. निवडणूक घ्यायची हिम्मत दाखवा मग आम्ही पाहतो. असे राऊत म्हणाले.
चोराला वाटतं आपण कुठेही घुसू शकतो. मात्र येथील जनता ही चौकीदार आहे. आमदार, खासदार, नगरसेवक, शाखाप्रमुख विकत घ्यायला मिंध्यांनी रेट कार्ड तयार केले आहेत. त्यासाठी एजंट देखील नेमले आहेत. आणि हे एजंट कमिशनवर काम करत आहेत. हा पैसे येतो कुठून? आता ईडी, आयकर विभाग कुठे आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.