Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊतांवर टीका करत निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला;

0

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राऊत कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलारविवारी संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईंना अश्रू अनावर झाले होते. राऊत यांच्या आईचे घराच्या खिडकीत उभं राहून आश्रू पुसतानाचे फोटो समाज माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले.

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राऊत यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार असल्याची माहिती सोमवारी सकाळी समोर आल्यानंतर निलेश राणेंनी ट्विटरवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली होती. “दुसऱ्यांच्या घरात पण आई असते. मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत यांनी विसरता कामा नये,” असा टोला निलेश राणेंनी लगावला.

संजय राऊत यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे त्यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी भांडूप येथील घरी गेले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आईची भेट घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांनादेखील धीर देण्याचा प्रयत्न केला. “संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आहे”, असा शब्द त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.