Latest Marathi News

BREAKING NEWS

भेट हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील निर्माता-दिग्दर्शक रमेश शर्मांची.. लवकरच “मेहेर”सिनेमा सेटवर!

भेट हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील निर्माता-दिग्दर्शक रमेश शर्मांची.. लवकरच "मेहेर"सिनेमा सेटवर!

0

नमस्कार,
“बारोमास” सारख्या प्रायोगिक नाटकाला व्यावसायिक नाटकांच्या शैलीत महाराष्ट्रातील नाट्यरसिकांच्या पुढ्यात ठेवण्याचा यशस्वी प्रयोग करणारे माझे मित्र सिने-नाट्य निर्माते व दिशा थिएटर्सचे संस्थापक दिपक नलावडे यांच्यामुळे मला मुंबईत गोरेगाव येथे हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील निर्माता-दिग्दर्शक रमेश शर्मा यांच्या समवेत काही तास घालविण्याची संधी मिळाली.बी.आर.चोप्रा,रवी चोप्रा सारख्या नामवंत निर्माता दिग्दर्शकांसमवेत सह दिग्दर्शक म्हणून अनेक वर्षे कार्यरत राहिलेल्या रमेश शर्मा यांच्या नावावर अनेक हिंदी चित्रपट, मालिका आहेत.अमिताभ बच्चन आणि हेमामालिनीच्या “बागबान” हा गाजलेल्या चित्रपटही त्यापैकी एक आहे. त्या चित्रपटाचे सह दिग्दर्शक होते.आता “हिंदू-मुस्लिम” हे कथासूत्र असलेला एक वेगळ्या धाटणीचा आणि सादरीकरण असलेला “मेहेर” नावाचा त्यांचा सिनेमा सेटवर जात आहे. दिपक नलावडे यांचे ते मित्र.याभेटीत सिनेमाच्या अनेक तांत्रिक बाजूंपासून रेकॉर्ड झालेल्या गाण्यांपर्यंतच्या विषयांवर रमेश शर्मा भरभरुन बोलले.दिपक नलावडे निर्मित ” बायोमास” या बळीराजाच्या समस्यांवर बेतलेलल्या झी अवॉर्डप्राप्त नाटकाचे नुकतेच दक्षिण महाराष्ट्रात प्रयोग झाले. प्रयोगांना नाट्यरसिक कशापध्दतीने उत्तम प्रतिसाद देत आहेत याची माहिती त्यांनी दिली.रमेश शर्मा यांना माझे “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” पुस्तक भेट दिले.
-राजा माने,
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ,
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र.

Leave A Reply

Your email address will not be published.