Latest Marathi News

BREAKING NEWS

“संजय राऊत यांना धमकी येणं हे गृहमंत्रालयाचं अपयश; देवेंद्रजी, झेपत नसेल तर राजीनामा द्या”

0

ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यता आली आहे. जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. धमकीनंतर राज्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून यापूर्वी बिष्णोई गॅंगने सलमान खानला धमकी दिली होती यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे

सुळे म्हणाल्या की, . अशी हिंमत या राज्यात करू पाहतंय याचा अर्थ हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे वाचाळवीरांचं सरकार आहे. त्यामुळे मंत्री आणि आमदार काही म्हटले तरी मला आश्चर्य वाटत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे प्रतिक्रिया दिली आहे.

धमकीवर संजय राऊत काय म्हणाले ?

आपल्याला आलेल्या धमकीनंतर संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा गद्दार गटाच्या सुरक्षेसाठीच आहे. राज्यातील कायदा व सुवव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही.सलमान खानला धमकी दिलेल्या गँगकडून मला धमकी आली आहे. विरोधकांना मारून टाकण्याचा सरकारचा डाव असल्याचा घणाघात धमकीनंतर संजय राऊत यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.