Latest Marathi News

BREAKING NEWS

अजय देवगन’चा नवा चित्रपट भोला BOX OFFICE वर जोरदार आपटला

0

अभिनेता देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भोला’ चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. दृश्यम २च्या यशानंतर पुन्हा एकदा अजय देवगणच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. भोला चित्रपट हा साउथच्या चित्रपटाचा रिमेक असल्याचं बोललं जात. त्यामुळे या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर होईल की नाही, अशी चर्चा होती. अशातच पहिल्या दिवशी चांगली कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या भोलाच्या कमाईत घट झालेली पाहायला मिळत आहे.

अजय ‘भोला’मध्ये मुख्य भूमिकेत तर आहेच, पण त्याचा दिग्दर्शकही आहे. अ‍ॅक्शनने भरलेला हा चित्रपट तामिळ हिट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. ‘भोला’च्या ट्रेलर आणि गाण्यांनी खूप चर्चा केली आणि त्यामुळेच त्याची ओपनिंग ‘दृश्यम २’ पेक्षा मोठी असेल अशी अपेक्षा होती. गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भोला’ने बॉक्स ऑफिसवर ११.२० कोटींची ओपनिंग केली.

पहिल्या दिवशी चित्रपटाच्या कमाईने दहाच्या आकड्याला नक्कीच स्पर्श केला, पण रिलीजपूर्वीचा ‘भोला’चा उत्साह पाहता हा आकडा अपेक्षेपेक्षा नक्कीच कमी आहे. आता शुक्रवारच्या वृत्तानुसार बॉक्स ऑफिसवर ‘भोला’चा दुसरा दिवस फारसा दमदार राहिला नाही. शुक्रवारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्ट्सनुसार ‘भोला’ने दुसऱ्या दिवशी ७.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.