Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊत यांचा पहिल्याच पत्रकार परिषदेत राज ठाकरेंवर टीका

0

संजय राऊत यांचा पहिल्याच पत्रकार परिषदेत महारष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लोक मला विसरले असतील असं वाटलं, पण तसं झालं नाही. लोकांना माझी काळजी आहे, प्रेम आहे. अनेकांचे फोन आले. आज सकाळीच शरद पवारांचा फोन आला. त्यांचीही प्रकृती ठिक नाही. कोठडीतले दिवस खडतर होते. मी कायदेशीर बाबींवर जास्त भाष्य करणार नाही.

कोर्टाने मला जामीन दिला आहे. पूर्ण देशात जल्लोषाचा माहोल झाला. मी टिपणी करणार नाही, ना ईडी ना ज्यांनी कट रचला त्यांच्यावर. त्यांना आनंद मिळाला असेल तर ठिक. माझ्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही. जे मला भोगावं लागलं, ते मी भोगलं, कुटुंबाने, माझ्या पक्षाने भोगलं, खूप गमावलं. राजकारणात हे होत राहतं.

मात्र अशाप्रकारचं राजकारण देशाच्या इतिहासात कधी घडलं नाही. देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हाही असं घडलं नव्हतं. शत्रूबाबतही घडलं नसेल. मी याबाबत कोणाला दोष देणार नाही, सिस्टिमला दोष देणार नाही. चांगलं काम करण्याची संधी सर्वांना मिळते, त्यांनी करावं, असं संजय राऊत म्हणाले आता मनसे नेते या टीकेला काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.