Latest Marathi News

BREAKING NEWS

शॉर्टगन नेमबाजी स्पर्धेत सिद्धार्थ पवारला रौप्यपदक ; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0

पुणे |

सिद्धार्थ पवार यांनी बालेवाडी मध्ये झालेल्या ३७ महाराष्ट्र राज्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी राज्य शॉर्टगन नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक प्राप्त केले आहे, छत्रपती क्रीडा संकुल येथे ९ सप्टेंबर रोजी बुधवारी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

अत्यंत चुरशीच्या ह्या स्पर्धेमध्ये सिद्धार्थचाच विद्यार्थी मुंबईचा अभिषेकने टारगेट बढत घेत सुवर्णपदक पटकावले. दिल्लीमध्ये २७ नोव्हेंबर पासून होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र शॉर्टगणचे ऑर्गनायझर सिद्धार्थ पवार यांनी दिली. या स्पर्धेमध्ये पुणे, मुंबई सातारा, कोल्हापूर व सोलापूरच्या शॉर्ट गन खेळाडूने भाग घेतला. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे पवार यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.