Latest Marathi News

BREAKING NEWS

समृद्धी महामार्गाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री भावुक झाले होते. पण हे त्यांचं ढोंग आहे

0

‘समृद्धी महामार्गाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक झाले होते. पण हे त्यांचं ढोंग आहे. फक्त बाळासाहेबांचा उल्लेख मोदींनी केला आहे. पण त्यांची प्रतिष्ठा जपणारे असे कोणतेही वर्तन तिथे केले नाही. तिथे जे छायाचित्र लावले होते, तिथे चौथ्या क्रमांकावर बाळासाहेब होते’ असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नवी दिल्लीमध्ये धनुष्यबाण चिन्हाबाबत आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. या निमित्ताने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

‘आम्ही गट वगैरे मानत नाही. शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये सुनावणी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याही वाया जाणार नाही. धनुष्यबाण हे उध्दव ठाकरे यांचे आहे. निर्णय हे आम्हालाच मिळणार आहे, असा दावा राऊत यांनी केला. ‘समृद्धी महामार्गाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक झाले होते. पण हे त्यांचं ढोंग आहे. फक्त बाळासाहेबांचा उल्लेख मोदींनी केला आहे. पण त्यांची प्रतिष्ठा जपणारे असे कोणतेही वर्तन तिथे केले नाही. तिथे जे छायाचित्र लावले होते, तिथे चौथ्या क्रमांकावर बाळासाहेब होते. पंतप्रधानांनी 11 तारे दिल्याचा उल्लेख केला.

पण त्यामुळे पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे हे दोन तारे आहे, त्यांचा अवमान आणि अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रखर सुर्य आहे, त्यांच्याबद्दल राज्यपालांनी विधान केलं होतं, ते तिथे बसलेले होते, अशी टीकाही राऊत यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चितांमणराव देशमुख यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचा अपमान करणारा व्यक्ती व्यासपीठावर आहे, मी इथं कसा बसणार, इथं तुम्ही कसे आले असं विचारतील असं वाटलं होतं. पण, मोदींनी शिंदेंच्या पाठीवर थाप मारली, ती थाप यासाठी असावी असावी शाब्बास बाळासाहेबांची शिवसेना फोडल्याबद्दल होती का, जे औरंगाजेबला जमले नाही, तुम्ही खंजीर खुपसून दाखवला त्यासाठी ती थाप होती का, असा टोलाही राऊत यांनी शिंदेंना लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.