संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गाधींबाबत केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधानाचे आणि त्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही उमटल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे फक्त एक सोंगाड्या असून त्यांना दिलेली स्क्रिप्ट ते सादर करत असल्याचं तुषार गांधी म्हणाले आहेत.
हेही वाचा : सरळ सेवा भरतीसाठी आकारण्यात येणारं शुल्क ही बेरोजगारांची अक्षरशः लूट आहे – रोहित पवार
हेही वाचा : हातात बंदूक घेऊन स्टाईल मारणाऱ्या बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
काय म्हणाले संभाजी भिडे?
अमरावतीच्या बडनेरामध्ये झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी वादग्रस्त विधान केलं. “मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले.