Latest Marathi News

BREAKING NEWS

सलमानने घातलेल्या घड्याळाने वेधले सर्वांचे लक्ष, विकत घेऊ शकता एक 2BHK फ्लॅट

0

अभिनेता शाहरुख खान याने एक निळ्या रंगाचे घड्याळ घातले होते. त्या घड्याळाची प्रचंड चर्चा झाली. पण आता अशाच एका विषयामुळे आणखीन एक अभिनेता चर्चेत आला आहे. तो म्हणजे अभिनेता सलमान खान सलमानचा सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याने एक घड्याळ घातलं आहे. त्याची जोरदार चर्चा होत आहे.

सलमानचा सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. नुकतेच बिग बॉस १६ वा सिझन समाप्त झाला. या सिझन मधील स्पर्धक सुंबुल तौकीर खान हिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये सलमानने तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि भाईजान आणि छोटा भाईजान. पण या फोटो मध्ये एक गोष्ट लक्षवेधी ठरली ती म्हणजे सलमानचे अनोखे घड्याळ. हे रोलेक्स कंपनीचं घड्याळ आहे.

या घड्याळाची किंमत ‘इंडियन वॉच कॉनेसर’ या इन्स्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच तर हे घड्याळ रोलेक्स कंपनीच्या YACHT मॉडेलचे आहे. या घड्याळमध्ये १८ कॅरेट सोन्याची केस लावली गेली आहे. या घड्याळाची किंमत तब्बल २८ लाख ९० हजार इतकी आहे. या घड्याळाची बाजारातील किंमत ३५ लाख आहे. सलमानच्या घड्याळाची अवाच्या सव्वा किंमतीने सर्वजण चकित झाले आहेत. हा फोटो खूप व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आता सलमान खान त्याच्या चित्रपटा व्यतिरिक्त त्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.