Latest Marathi News

BREAKING NEWS

सदाभाऊ खोत, मर्यादेत राहा; रुपाली चाकणकरांनंतर आता रोहित पवारांचा थेट इशारा

0

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांना धक्का देत थेट शिवसेना भाजपाच्या सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंती पराची शपथ घेतली. यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या परिस्थितीत पुन्हा पक्षबांधणीसाठी शरद पवार यांनी महाराष्ट्र भर फिरायला सुरुवात केली आहे.

येवला येथे सभा घेत बंडखोरांवर टीका केली. त्यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते संतप्त झाले आहेत. अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांना कुवत दाखवली तर आमदार रोहित पवार यांनी मर्यादेत राहण्याचा इशाराच दिलाय.

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना सैतान असं म्हटलं होतं. खोत यांच्या विधानवरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. आधी रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर प्रहार केला. त्यानंतर, आमदार रोहित पवार यांनीही थेट सदाभाऊ खोत यांची लायकी काढली आहे.

सदाभाऊ खोत यांना मला सांगायचंय की, मर्यादेत राहा. मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्हीही आमच्या पद्धतीने दाखवू शकतो. बातमी करण्यासाठी तुम्ही तुमची लायकी सोडत असाल तर आम्ही काय इथं शांत बसणार आहोत का?, मर्यादेत राहावा, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी थेट सदाभाऊ खोत यांना इशाराच दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.