प्रत्येक राजकर्त्यांनी मूळ आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन राजकारणात आपलं नशीब अजमावता मात्र राज्य महिला आयोग अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर यांच्या मुलाने मात्र दुसरं क्षेत्र निवडल असून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे/ प्रेम’ ही एक अशी भावना आहे जी कधी ना कधी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येते. यामध्ये काहींचं नातं पूर्णत्वास जातं तर काहींना दुःख, अपयश पचवावं लागतं.अशाच प्रेमाची कथा सांगणारा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘विरजण’. चित्रपटाच्या नावावरुन प्रेमप्रकरणात कुठेतरी नक्की विरजण पडणार असा अंदाज येत आहे. प्रेमाची नवी परिभाषा अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा मुलगा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकरने राजकारणात नशीब न अजमावता थेट अभिनय क्षेत्रात पाऊल टाकत सर्वांनाच चकित केलं आहे. सोहम चाकणकर ‘विरजण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. सोहम पहिल्याच सिनेमातून एक रोमँटिक अभिनेत्याच्या रुपात समोर येत आहे. सोहमला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वच उत्सुक झाले आहेत.
प्रेम करणं तितकं सोपं नसत. ज्याप्रकारे प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. तशाच प्रेमाच्यासुद्धा दोन बाजू असतात.एक म्हणजे प्रेम करणं आणि दुसरं केलेलं प्रेम निभावणं. प्रेम करण्यापेक्षा प्रेम निभावणं किती कठीण असत. यादरम्यान कोण-कोणत्या अडचणी येतात. कोणत्या भावनिक गोष्टींमधून जावं लागत.या सर्व गोष्टींचा उलघडा करणारा हा सिनेमा असणार आहे. यामध्ये सोहम चाकणकरसोबत अभिनेत्री श्रद्धा ठाकरे दिसणार आहे. या नव्या जोडीला प्रेमात बुडालेलं पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान नुकतंच या चित्रपटाच्या संगीत अनावरणाचा सोहळा पार पडला.