Latest Marathi News

BREAKING NEWS

रिया चक्रवर्तीमुळे सुशांत झाला ‘ड्रग अ‍ॅडिक्ट’; एनसीबी’चा गंभीर आरोप

0

 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा आकस्मिक मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला. अजूनही सुशांतच्या मृत्यूचा तपास पूर्ण झालेला नाही. आता पुन्हा एकदा या प्रकरणावर चर्चा सुरू झाली आहे. एननसीबीने सुशांतच्या मृत्युप्रकरणी आरोपपत्राचा मसुदा सादर केला आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या नावांचा समावेश आहे.

अभिनेत्री आणि सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी यांच्यासह ३५ जणांवर बॉलिवूड आणि उच्चभ्रू समाजात ड्रग्ज वितरण करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या सगळ्यांनी मिळून सुशांतला ड्रग्जच्या आहारी नेलं आणि त्याला ड्रग्ज पुरवले असंही या आरोपपत्राच्या मसुद्यात म्हटलं आहे.

याबाबतचं वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे. सुशांत २०१८ पासून ड्रग्ज घेत होता, असं या ड्राफ्टमध्ये म्हटलं आहे. 2020 मध्ये सुशांतला या आरोपींकडून ड्रग्ज पुरविण्यात आले होते. त्याला पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी नेण्यात आणि त्यासाठी त्याला ड्रग्ज पुरविण्यात या आरोपींचा सहभाग असल्याचा ठपका यात आहे. कायद्याअंतर्गत विविध कलमं या आरोपींवर लावण्यात आली आहेत.

यामध्ये रिया, तिचा भाऊ शौविक आणि त्याच्या घरी काम करणारे दोन कर्मचारी यांच्यावर सुशांतसाठी ड्रग्ज आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. २०१८ पासून सुशांतला त्याच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विविध व्यक्तींकडून ड्रग्जचा पुरवठा होत होता असं या ड्राफ्टमध्ये एनसीबीने म्हटलं आहे. २०२० मध्ये सुशांत किंवा रिया चक्रवर्तीच्या मागणीवरून ड्रग्जचा पुरवठा केला जात होता, असा दावा एनसीबीने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.