रितेश देशमुखने ‘वेड’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात रितेश देशमुखही मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच त्याची रिअल लाइफ पत्नी जेनेलिया डिसूझा त्याच्या सोबत दिसत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ओपनिंगसह जबरदस्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहांच्या बाहेर मोठी गर्दी दिसून आली. या चित्रपटाने आपल्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
‘वेड’ चित्रपटातील रिअल लाइफ कपल जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडते. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचवेळी वेडचं ओपनिंग वीकेंड कलेक्शन समोर आलं आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा १० वर्षांनी स्क्रीन शेअर करणार आहेत तसेच जिया शंकर, अशोक सराफ आणि शुभंकर तावडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सलमान खानचाही एक कॅमिओ आहे.
तरण आदर्शच्या ट्विटनुसार, वेडने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशा प्रकारे, मराठी चित्रपट असल्याने त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जबरदस्त आहे. वेडने पहिल्या दिवशी २.२५ कोटींची कमाई केली. त्यानंतर शनिवारी 3.25 कोटींचा व्यवसाय केला. आणि रविवारी या चित्रपटाने 4.50 कोटींचा गल्ला जमवला. अशा प्रकारे या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 10 कोटींची कमाई केली आहे.