Latest Marathi News

BREAKING NEWS

‘पठाण’विरोधात बजरंग दलाने मॉलमध्ये घुसून शाहरूखचं पोस्टर फाडलं

0

अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा बहुचर्चित ‘पठाण’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून भगव्या कलरच्या बकानीमुळे आधीच या चित्रपटावर अनेकांनी सद्यकुं टीका केली होती . या चित्रपटातबाबत दररोज नवनवीन वृत्त समोर येत आहेत. त्यामुळे पठाणच्या मेकर्स समोरील अडचणी आणखी वाढत आहेत. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झाल्यापासूनच काही ठिकाणी त्याला कडाडून विरोध केला जात आहे.

तसेच या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या कपड्यांवर आक्षेप घेण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर या सर्व प्रकरणात दोन गट पडलेले दिसून येत आहेत. यामध्ये काहींनी पठणला समर्थन दिलं आहे तर काहींनी जोरदार विरोध केला आहे. अशातच आता ‘पठाण’ विरोधात बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. ‘पठाण’ ला सुरुवातीपासूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे. अशातचहा चित्रपट रिलीज न करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. अशातच आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते एका मॉलमध्ये पठाणला कडाडून विरोध करताना दिसून येत आहेत. त्यामुळे पठाणच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अहमदाबाद येथील एल्फा मॉलमधील आहे. यामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत तोडफोड केलेली दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर कार्यकर्त्यांनी चित्रपटाला विरोध दर्शवत अभिनेता शाहरुख खानचे पोस्टरसुद्धा फाडले आहेत. त्यामुळे चित्रपटाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.