Latest Marathi News

BREAKING NEWS

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा आढावा

0

पुणे |

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शहरातील नवीन पोलीस ठाण्यांच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी आमदार बापूसाहेब पठारे, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पोलिसांना आवश्यक सुविधांसाठी सहकार्य करण्यात येणार असून, त्यांनी शहरात त्वरित वाहतूक वॉर्डन नियुक्त करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, महापालिकेकडील आवश्यक सुविधांसाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.