Latest Marathi News

BREAKING NEWS

रा. स्व. संघाने आपल्याला जे संस्कार दिले आहेत, त्यानुसार सर्व कार्यकर्त्यांनीही काम करावे – चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे |

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला ७५ वर्षे पूर्ण झाली. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे महानगराच्या वतीने पूर्व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.

या प्रसंगी बोलतांना पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

“आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या वाटचालीत एक कार्यकर्ता म्हणून जोडलं जाणं हे माझ्यासाठी भाग्याचंच आहे. कारण, विद्यार्थी परिषदेने एक नव्हे अनेक संस्कारक्षम पीढी घडविल्या, त्यापैकी मी देखील असल्याचे पाटील म्हणाले. आणि सर्वांना अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थी परिषद आणि रा. स्व. संघाने आपल्याला जे संस्कार दिले आहेत, त्यानुसार सर्व कार्यकर्त्यांनीही काम करावे, असे आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास अभाविपचे पूर्व कार्यकर्ते तसेच सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर तसेच पुणे महानगरातील अभाविपचे सर्व पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.