मुंबई | रत्नागिरी जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घवघवीत यश संपादित केले. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी आज शिवतिर्थ येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सकाळी भेट घेतली होती. मनसे उपाधयाक्ष आणि रत्नगिरी सपंर्क अध्यक्ष सतीश रत्नाकर नारकर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.
या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करणाऱ्या तसेच मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुद्धा अभिनंदन राज ठाकरे यांनी केले.
मागच्या महिन्यातच ६ दिवसीय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आले होते. सदर दौरा संपताच रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचातीच्या निवडणूका पार पडल्या. राज ठाकरे यांचा दौरा तसेच कोकणाच्या विकासासाठी मनसेचे ध्येय तर दुसरीकडे राज्यात सुरु असलेल्या राजकारणातील गढूळ वातावरणामुळे मनसेला पुरेपूर फायदा झाल्याचे चित्र या निवडणुकीच्या निकालानंतर दिसून आले आहे.
यावेळी सर्व सदस्यांना जोमाने काम करण्याचा मोलाचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला होता तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याचप्रमाणे मनसेचे विचार घराघरात पोहचवण्याची सर्वांनी मिळून काम करण्याचा कानमंत्र यावेळी राज ठाकरेंनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना दिला.