Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

0

 

जळगाव: जळगावमध्ये जिल्हा दूध संघात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे समर्थक आमनेसामने आल्याचे दिसून येते.भाजपचे गिरीश महाजन यांचे ‘प्रशासक मंडळ’ आणि एकनाथ खडसे यांचे ‘संचालक मंडळ’ या दोन्ही समर्थकांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जळगावात वातावरण टिपण्याची शकयता वर्तवली जात आहे.

या समर्थकांमधील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाविरोधात प्रशासक मंडळाने जळगाव पोलिसांत तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे. गिरीश महाजन यांचे समर्थक अरविंद देशमुख यांनी ही तक्रार केली आहे.

संचालक मंडळ बरखास्त असतानासुद्धा मंदाकिनी खडसे यांनी आणि त्यांच्या ११ संचालकांसह अनधिकृत दूधसंघाच्या मिटींग हॉलमध्ये बैठक घेतल्याचे तसेच त्यांनी बेकायदेशीर प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असे, तक्रारीत नमूद केले आहे. त्याचबरोबर संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येते.

 

.

Leave A Reply

Your email address will not be published.