Latest Marathi News

BREAKING NEWS

काय सांगता नायजेरियन आरोपीकडे मिळाले आधार आणि पॅन कार्ड

0

 

मुंबई | परदेशी नागरिकांचे वाढते प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखी बनत आहे. त्यांच्याकडून गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत आहेत. अशातच आता तर वसईत नायजेरियन आरोपीकडे चक्क त्याच्या नावाचे भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडल्याचे उघड झाले आहे. याच प्रकारामुळे इतर देशांतून बेकायदा भारतात घुसखोरी केलेल्या नागरिकांना बनावट आधार कार्ड बनवून देणारे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता असून, पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

वसई तालुक्यातील नालासोपारा शहरामध्ये मोठ्या संख्येने नायजेरियन आणि इतर परदेशी नागरिक राहतात. विरार, वसई, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोडमध्ये स्वस्तात घरे मिळत असल्याने ही मंडळी येतात. याव्यतिरिक्त छुप्या पद्धतीनेही परदेशी नागरिक राहत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यातील अनेक नागरिक हे मादक पदार्थांच्या तस्करीत आणि लॉटरी फसवणुकीच्या गुन्ह्यात सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तसेच याच गुन्ह्यातील आरोपींकडून त्यांच्याच नावाचे आधार आणि पॅन कार्ड सापडले आहे. त्यांनी ही कागदपत्रे कशी बनवली व कोणाकडून बनवली याचा शोध सुरू आहे. नायजेरियन नागरिक पर्यटन, शिक्षण, व्यवसाय अथवा वैद्यकीय व्हिसावर भारतात प्रवेश करतात. त्यानंतर ते या ठिकाणी आपले बस्तान मांडून गैरधंदे करायला सुरुवात करतात. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक तरुण-तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे.

अनेक नायजेरियन नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते याच ठिकाणी राहत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून पुढे आले आहे. दरम्यान, काही नायजेरियन भारतात राहण्यासाठी अमली पदार्थांच्या केस करवून घेत असल्याचे अनेक वेळा बोलले जाते, तर यांना भारतात राहण्यासाठी मज्जाव केला तर काही तांत्रिक अडचणींना पोलिसांना सामोरे जावे लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.