Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा भाजप-शिंदे गटाला पाठिंबा! म्हणाले,

0

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे मागील काही दिवसांपासुन राष्ट्रवादीच्या सभांना हजर राहत नसल्याचे वृत्त समोर आले होते अशातच अमोल कोल्हे राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा होत असताना दुसरीकडे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले होते तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी सावरकरांच्या मुद्दयावरून केलेल्या विधावरून राज्यातील नाही तर देशातील राजकारण तापलेले दिसून आले होते या मुद्दयाला धरून थेट डॉ अमोल कोल्हे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला पाठिंबा देत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

कोल्हे म्हणाले की, प्रत्येक मराठी माणसाला स्वातंत्रवीर सावरकरांविषयी आदर आहे आणि तो असणे स्वाभाविक आहे. आपल्या साहित्य वाचनाची सुरुवात ‘काळे पाणी’ या पुस्तकाने झाली आहे. सावरकर हे अनेक क्रांतिकारकांची ते प्रेरणा राहिले आहेत. जेव्हाही महापुरुषांचा अपमान झाला, तेव्हा आम्ही त्याचा कठोर शब्दात निषेध केला. खरे तर कोणत्याही महापुरुषांचा राजकीय वापर केल्यापेक्षा त्यांच्या विचारांचा जागर होणे गरजेचे आहे. त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

सावरकर गौरव यात्रेबाबत बोलताना अमोल कोल्हे यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. राहुल गांधींनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान काही प्रश्न केंद्रातील मोदी सरकारला विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरे अद्यापही देशाला मिळालेली नाहीत. सावरकर गौरव यात्रा काढून त्या चार प्रश्नांची उत्तरे मिळत असतील, तर अशी यात्रा नक्कीच काढावी. सावकरांच्या साहित्यांचा जागर हा प्रत्येकाने करावा. प्रत्येकाच्या मनात सावरकरांविषयी आदर असावा. सावरकर गौरव यात्रा काढल्याने त्यांच्या साहित्याचा जागर होईल, पण या यात्रेने राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतील, तर त्या यात्रेचे नक्कीच स्वागत करू, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.